Saturday, 1 August 2020

क्षणभर मोह

 

 एका गावात शाळेतील एक शिक्षक सेवानिवृत्त झाले. म्हणून शासनाने तालुक्यातीलच एका नविन शिक्षकाची नेमणूक केली. ते शिक्षक त्या शाळेत रुजू होण्यासाठी एस.टी. बसने निघाले, कंडक्टरला पैसे दिले आणि तो जागेवर बसला. कंडक्टरने तिकिटाचे पैसे घेतले व उरलेली रक्कम शिक्षकाला परत केली. तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, त्यात 10 रु. जास्त आले आहेत.

 

दुर्बद्धी ते मना । कदा नुपजे नारायणा ।। {तु}

 

 

शिक्षकांने असा विचार केला की आता कंडक्टर घाईत आहे. आपण थोड्या वेळाने पैसे परत करुया, काही वेळ झाला तरी कंडक्टर अजुनही कामातच होता. शिक्षकाच्या मनात दुस-यांदा विचार आला की, कंडक्टर घाईतच आहे तर त्याला 10 रु. परत केले काय अन नाही काय, त्याला काय फरक पडेल ? 10 रु. आपणास लाभ झाला असे समजू. आपण याचा काहीतरी सदुपयोग करु.


 


    शिक्षकाच्या मनात असे द्वंद्व चालु असतानाच शाळेचे गाव आले. एस.टी.तून उतरताना अचानक शिक्षकाचा हात खिशाकडे गेला आणि त्यातून 10 रुपयाची नोट बाहेर आली व कंडक्टरला परत केली व शिक्षक म्हणाले, अहो ! तुम्ही मला घाईगडबडीत 10 रु. जास्त दिले होते.



कंडक्टर हसुन म्हणाले,"गुरुजी ! तुम्हीच या गावचे नवे शिक्षक आहात काय? "शिक्षक हो म्हणाले. त्यावर कंडक्टर बोलू लागले, गुरुजी, मी मुद्दाम  10 रु. जास्त दिले होते. मला हे पहायची खुप इच्छा होती की, ज्या वर्गात राष्ट्र घडते त्या वर्गाचा शिल्पकार जसा बोलतो, जसा शिकवितो, तसाच आचरण करतो का ? म्हणुन मी मुद्दाम 10 रु. जास्त दिले होते. मला आता कळून चुकले आहे की, या गावांने ही कोवळी मुल ज्याच्या ताब्यात दिली आहेत ती नक्कीच घडल्याशिवाय राहणार नाहीत. 'गुरुजी, मला क्षमा करा ! एवढे बोलून कंडक्टरने बेल वाजवली........



गुरुजींना आता घाम फुटला होता. ते आकाशाकडे पहात म्हणाले, ईश्वरा,10 रु. मोह मला किती महागात पडला असता. देवा तु खरच दयाळू आहेस. नोकरीच्या पहिल्या दिवशी माझी चाचणी घेतलीस आणि मला पात्र ठरवलस !

    "स्वार्थ, मोह, वाईट असतो. ज्या क्षणी मोहाने मन ग्रासते. त्याक्षणी मानव अधोगतीकडे फेकला जातो.

 


 

Saturday, 18 July 2020

Hemant's Words...

प्रेरणा, सार्वभौम उर्जा आणि पुनर्जन्म


शब्दांना कशी चाल द्यावी हे उकलत नाही. परंतु तरीही हा माझा छोटासा प्रयत्न. तसा हा उशीरच झाला. परंतु मनातील धगधग, भावना योग्य वेळी प्रकटल्या नाहीत तर तेही अयोग्यच आहे. म्हणून हा प्रयत्न. जीवनातील काही घटना अशा असतात की, त्यानंतर आपले भावजीवन कायमचे बदलुन जाते. तशीच एक घटना माझ्याजवळ घडली. 

18 ऑगस्ट 2019 चा दिवस विसरता येणे शक्य नाही. एवढ्या भीषण अपघातातून मी वाचलो हा दैवी चमत्कारच मानतो तसा तो चमत्कार झालाही आणि मी वाचलो. दुर्दैवाने संपूर्ण एसटीबस उभी कापली जावूनही माझे सुदैव म्हणून मला केवळ उजव्या हाताला आणि डाव्या पायाला दुखापत झाली. माझ्या पेक्षाही इतरांना ज्या दुखापती झाल्या, ज्यांचे निष्प्रभ प्राण गेलेत ते भयंकरच होते. उर्वरीत संपूर्ण प्रसंग तर सर्वांनाच ज्ञात आहे. तो परत आठवण करवत नाही. भाग्यवंतांच्या यादीत माझा नंबर लागला.


आणि त्यानंतरचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी अनमोल असा ठरत गेला. सर्वप्रथम जवळ आले ते प्रशांत, कृष्णा आणि अजय. त्यांनी मला हॉस्पीटलला नेले. हॉस्पीटलला माझी वाट पाहत असलेले योगेशराव, रवीराव, माई, यामिनी आणि घरी मायेच्या ओढीनेच माझ्या जवळ आलेले आई, काका-काकु, राजश्री काकु,धर्मपत्नी गीता, संजय मामा, प्रज्ञा, ममता,अमोल, अनुश्री या सर्वांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे अजुनही मला काही उमजत नाही. त्याच रात्री मित्रवर्ग धीरज, अविनाश यांची उडालेली घाबरगुंडी,थरथराट आणि त्यातच सर्वांचा माझ्या पर्यंत पोहोचण्याचा आटापिटा पाहिला.

सकाळी आई, काका, गीता, पुण्याहुन जयंत, जयश्री, कौस्तुभ,चिमणी,देव आणि औरंगाबादहुन निलेश, महेश ही सर्व मंडळी तत्परतेने आल्यावर त्यांना असे झाले की, देठ नसलेले फुल हाती असावे तसे झाले. मी जगलो म्हणून हसावे का मला दुखापत झाली म्हणून रडावे तेच कुणाला सुधरेना. जीवनातील काही घटनाच अश्या असतात की, त्यावर माणसाच्या वाणीचे भाष्य अपुरे पडते. सर्वांनी मला जवळ येवून पाहिले. कुठे काय लागले याची विचारपुस झाली. प्रत्येकाच्या डोळ्यातील अश्रुंना वाट मोकळी झाली. काकांनी आणि आईने माझ्या डोक्यावरुन मायेने हात फिरवला. शब्दांपेक्षा तो स्पर्शच खुप बोलका होता. त्या स्पर्शानेच पुन्हा आयुष्य बहरले. त्यानंतर मला बघायला आलेला प्रत्येक हितचिंतक, नातेवाईक, माझे मित्र फक्त हेच म्हणत की, आई वडीलांच्या पुण्याईने तुझा पुनर्जन्म झाला. खरंच किती पुण्यवान असतात आपले आईवडील. जे स्वत:ची पुण्याई सुध्दा आपल्या मुलांनाच देतात.त्याची प्रचिती आलीच. 

Add caption


त्यानंतर प्राजक्ताचे झाड फुलावे तसे माझ्या जीवनातील या सर्वांच्या आशिर्वादाचे फुलं फुलत गेले. पुण्याईचे बळ वाढीला लागले. मायेला फक्त एकच माहित असते, प्रेम करणे ते ही मुकपणे. परंतु इथे माया आणि काळजी दोघांनी असा घेर मांडला की, मला बरे व्हायला वेळच लागला नाही. नाना, बापूंनंतर माझ्यासाठी, घरासाठी सर्व काही करणारे, आम्हाला कसलीही उणीव न भासू देण्याचा जणू संकल्पच हाती घेतलेले माझ्यासाठी नेहमीच जीव की प्राण करणारे एवढेच नाही तर या जगाची ओळख करुन देण्यापासून आजतागायत माझा हात घट्ट धरुन ठेवणारे विजु काका यांच्या प्रेमामुळेच, परिवाराने दिलेल्या प्रोत्साहनाने मला लवकर चालायचे बळ दिले. शारिरिकदृष्टया माझा एक हात निकामी झाला असतांनाही एवढे हात माझ्या पाठीला मिळाले की, मी या माझ्या निकामी हाताची पर्वा चिंता करण्याची गरजच पडली नाही. या सर्वांचा उतराई होणे अशक्यच. 
कृष्णा आणि प्रशांतने खुप काळजी घेतली. थोडी थोडकी नव्हे तर आतापर्यंत. त्याचा सतत उच्चार असायचा, ‘भाऊ, हात सांभाळ. तु नको करु. मी करतो, राहु दे’. आज जो संपूर्ण मी बरा झालो त्याचे सर्व श्रेय एवढ्या मोठ्या दृश्य अदृश्य परिवाराचे आहे. जवळपास वर्षभर मला भेटायला येणारे सर्व ज्ञात अज्ञात नातेवाईक, मित्रवर्ग यांच्या ऋणातच कायम रहावेसे वाटते. अखंड विश्वात माझ्या इतका आनंदी कोणीही नसेल की ज्याला एवढा मोठा परिवार मिळाला. खुप आहे लिहीण्यासारखं पण सद्या एवढच. लोभ आहे तो वृद्धिंगत व्हावा.

आपलाच 

हेमंत भाऊ
 








Saturday, 28 March 2015

PMRDAचे खाते ३०० कोटींचे

म. टा. प्रतिनिधी, पुणे




 






पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर या प्राधिकरणाचे खाते सुमारे ३०० कोटी रुपयांच्या भागभांडवलाने उघडले जाणार असून, या प्राधिकरणाला पाठबळ देण्यासाठी आर्थिक आराखडा निश्चित करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय 'पीएमआरडीए'चे कार्यालय व कर्मचारी नियुक्तीचा आकृतिबंधही निश्चित करण्यात येत आहे.
















'पीएमआरडीए'च्या स्थापनेनंतर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाला (पीसीएनटीडीए) त्यात विलीन करण्याचा प्रस्ताव आहे. 'पिंपरी प्राधिकरणाकडे असलेल्या मोक्याच्या जागा; तसेच ३०० कोटी रुपयांहून अधिक असलेला निधी हा 'पीएमआरडीए'चा आर्थिक पाया ठरणार आहे. याशिवाय राज्य सरकारची आर्थिक मदत व अन्य स्रोतांद्वारे पीएमआरडीएला आर्थिकदृष्ट्या सबळ करण्याचा फायनान्शियल पॅटर्न तयार केला जात आहे,' असे मंत्रालयातील सूत्रांनी 'मटा'ला सांगितले.









'पीएमआरडीए'च्या स्थापनेचा अध्यादेश येत्या दोन दिवसांत जारी होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. 'महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग अॅक्टमधील (एमआरटीपी) चॅप्टर तीन (ए) प्रमाणे 'पीएमआरडीए'ची रचना असणार आहे. तूर्त पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय सदस्यांची कमिटी त्यासाठी काम करणार आहे. पीएमआरडीएचे कार्यालय तूर्त पिंपरी प्राधिकरणातच ठेवण्याचा प्रस्ताव आहे,' असे स्पष्ट करण्यात आले.







मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) स्थापनेनंतर मुंबईच्या विकासाला हातभार लागला. त्याच धर्तीवर पीएमआरडीएचे काम चालणार आहे. शहरातील दोन्ही महापालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड, जिल्हा परिषद यांच्याशी समन्वय साधून विकासाची कामे करता येणार आहे.















पायाभूत सुविधांचे मॉडेल

शहराभोवतीच्या भागातील मेट्रो, बीआरटीपासून रिंगरोडपर्यंतचे निर्णय एकाच अॅथोरिटीखाली घेणे शक्य होणार आहे. पीएमआरडीएची कमिटी ही मंत्र्यांची असल्याने कोणत्याही प्रश्नावर तत्काळ निर्णय घेणेही शक्य होणार आहे. 'पीएमआरडीए'च्या माध्यमातून शहरालगतच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांचे मॉडेल तयार करणे शक्य होणार आहे.